Showing posts with label मराठी. Show all posts
Showing posts with label मराठी. Show all posts

Tuesday, November 16, 2021

Five books from my book shelf... Marathi Audio Books

Recently I (re)read some books and their translations along with audio version. The theme of the five books that I read in a series revolved around Travelogues, Immigration and philosophy

Here is a list of the books: 

1) Old man and the sea - Ernest Hemingway : काय वाट्टेल ते होईल - पु ल देशपांडे 

2) Big City little boy - Manuel Komroff : मंतरलेले बेट - व्यंकटेश माडगूळकर 

3) The Alchemist - Paulo Coelho : द अलकेमिस्ट - डॉ  सुचिता नांदापूरकर फडके

4)   जावे त्यांच्या देशा - पु ल देशपांडे :  वाचन - प्रसाद ओक 

5)   अपूर्वाई - पु ल देशपांडे :  वाचन - अस्ताद काळे 

There is a general agreement that translated books are generally not as good as the original books. But there are always exceptions. Recently I came across at least three books that are translated into Marathi from English that I enjoyed more than the English versions that they were translated from. The Marathi audio version of these books keeps the reader (listener) more engrossed !  

Here is the list of these three books: 

Old man and the sea - Ernest Hemingway : काय वाट्टेल ते होईल - पु ल देशपांडे 

Big City little boy - Manuel Komroff : मंतरलेले बेट - व्यंकटेश माडगूळकर 

The Alchemist - Paulo Coelho : द अलकेमिस्ट - डॉ  सुचिता नांदापूरकर फडके    

In the same series and theme of books I would like to recommend two more audio books in Marathi. An audio versions (audio books) the classic books in Marathi by Pu La, Jave Tyancha Deshaa (जावे त्यांच्या देशा) and Apurvaai (अपूर्वाई ) were truly enjoyable ( read by Prasad Oak and Astaad Kale respectively ) 

जावे त्यांच्या देशा - पु ल देशपांडे :  वाचन - प्रसाद ओक 

अपूर्वाई - पु ल देशपांडे :  वाचन - अस्ताद काळे 

Thursday, June 13, 2019

June : My favorite month of the year




June is my favorite month of the year. Here is a post in Marathi written earlier on June 12th, 2015 on my wordpress blog.

जून महिना हा माझा आवडता महिना आहे.  त्याचं मुख्य कारण म्हणजे … फणस पिकायला खरी सुरवात होते ती जून महिन्यात येणार्या ज्येष्ठ मासात !  अजून एक कारण म्हणजे कोकणात “अंतू शेठ” बरोबर होणारी  वार्षिक भेट आणि होणार्या चर्चा … आप्तेष्ठांचे वार्षिक स्नेह संमेलन … नानू , नाथा , गजा , बबडू , परांजप्या, गोखले आणि हमखास भेटणारे चितळे मास्तर !

जून महिना मला तसा वर्षातला सर्वात महत्वाचा महिना हि वाटतो.. कारण वर्षा च्या मध्यावर , पूर्वार्धा कडे  मागे वळून हि पहाता येतं आणि उत्तरार्धा ची आखणी हि करता येते !

मराठी साहित्या च्या दृष्टी नी मात्र जून महिन्याला  एक कारुण्य आणि उदासीनते ची किनार आहे .. त्याचं कारण हि तसंच आहे.. अनेक  प्रसिद्ध मराठी साहित्यिकानी ह्या जून महिन्यातच जगाचा निरोप घेतला … अभिजात मराठी साहित्य आणि संगीतातील अनेक  नामवंतांची पुण्यतिथी ह्या जून महिन्यातंच !

जून १ १९३४ – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर , नाटककार आणि विनोदी लेखक
.
१९९८ – गो.नी. दांडेकर , मराठी कादंबरीकार

जून ४  १९१८ – गोविंद वासुदेव कानिटकर, मराठी साहित्यिक

जून ५  १९८७ – ग. ह. खरे , भारतीय इतिहासतज्ञ.

जून ६  २००२ – शांता शेळके , मराठी कवियत्री.

जून ७  १९९२ – डॉ. स. ग. मालशे, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक

जून ११ १९५० – पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी, बालसाहित्यिक, स्वातंत्र्य सैनिक

जून १२ २००० – पु. ल. देशपांडे , मराठी मनावर दीर्घ काळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे लेखक, कवी, नाटककार, अभिनेता (चित्रपट, रंगभूमी), दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार.

जून १३  १९६९ – प्रल्हाद केशव अत्रे, मराठी लेखक , पत्रकार, संपादक, राजकारणी, शिक्षणतज्ञ, नाटककार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक व प्रभावी वक्ते.

जून १७  १८९५ – गोपाळ गणेश आगरकर , समाजसुधारक, विचारवंत.

जून २०  १९९७ – वासुदेव वामन पाटणकर ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर, मराठीतील प्रथम शायर

जून २६  २००१ – वसंत पुरुषोत्तम काळे, मराठी साहित्यिक  ( व पु )

... अखेर जून महिन्यात संगित नाटक क्षेत्रातील एका उत्तुंग तारया ची जयंती हि आहे … जून २६  .. बालगंधर्व नारायण श्रीपाद राजहंस ! 

अभिजात मराठी साहित्याला एक अभूतपूर्व लोकप्रियता मिळवून देणार्या .. व पु , प्र के अत्रे , गदिमा आणि पु ल ह्या साहित्यिकांनी मला मराठी साहित्या ची गोडी लावली  ..  १२ जून हि पुलं ची पुण्यतिथी , म्हणून हि ब्लॉग पोस्ट आज टाकावीशी वाटली !

जन्म आणि मृत्यू ह्या विषया वर चार ओळी, जे एक अमर गीत म्हणून आपल्याला माहित आहे ...आरती प्रभू ,भास्कर चंदावरकर आणि रवींद्र साठे, यांनी या गीता ला अमरत्व दिलं आहे .. माझं  सर्वात आवडतं गाणं  ...

अंत झाला अस्ताआधी,
जन्म एक व्याधी, 
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी
देई कोण हळी, त्याचा पडे बळी आधी,
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !



युट्यूब वर "कुणाच्या खांद्यावर" ची माझी प्लेलीस्ट 


 -------------------------------------------------------------------------

“जन्म आणि मृत्यु ह्या दोन टोकांच्या मधे पकडून नियतीने चालवलेली आपणा सा‍र्‍यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणार्‍या माणसांची ‘हसवणूक’ करण्यापलीकडे आणखी काय करायचं? ”

– पु.ल  (प्रस्तावना : हसवणूक)

Friday, December 21, 2018

कॉपी-पेस्ट करण्यात "सवाई"



मराठी ब्लॉगपोस्ट लिहिल्या वर एक हमखास अनुभव म्हणजे लोकं "copy paste" करतात आणि सरळ निर्लज्ज पणे स्वतःची पोस्ट म्हणून खपवतात !!  काही इरसाल लोकं "sharing from web" वैगरे टाकतात पण मूळ लेखकाचे नाव किंवा नक्की कुठून copy केलं ह्या बद्दल लिहित नाहीत.
मला हा अनुभव दरवर्षी विशेषतः सवाई बद्दल च्या मराठी पोस्टस वर येतो. लोकं हमखास copy-paste करून त्यांच्या timeline / WA group वर टाकतात ! त्यांना हे कळत असतं कि ते चोरी करताहेत , पण ते स्वतः ची समजूत घालून घेतात कि "आपण हे लोकांन साठी करत आहोत" किंवा "शास्त्रीय संगीताच्या प्रचारा " साठी हे असं "चोरी" करणे व स्वतः चे नाव टाकून पुढे ढकलणे गरजेचे आहे ! असो !
मी व्यावसायिक लेखक नसल्या मुळे मी असल्या चोऱ्या ignore करायला शिकलो आहे. गेल्या वर्षी एका माणसानी तर माझी ब्लॉगपोस्ट copy-paste करून स्वतः च्या नावाने , मी admin करत असलेल्या एका फेसबुक ग्रुप आणि WA ग्रुप वर टाकली होती. शिवाय तो म्हणत होता कि त्याला ती पोस्ट एका forward मधे आली !! आता forward मधे आली तर त्याचं नाव कसं काय त्या पोस्ट च्या लेखका च्या ठिकाणी हा प्रश्न विचारून काही उपयोग नव्हता. खोटं बोलणं आणि खोट्या जगात वावरण्या साठी (virtual world of social media) , ह्या लोकांची एक वेगळीच मानसिकता तयार झालेली दिसली .. ती बदलणे शक्य नाही .. किंबहुना ती मनोविकृती ह्या लोकांना social media वर प्रसिद्ध होण्या ला , लाईक्स मिळवायला कारणीभूत असेल. असे लोकं फक्त मराठीच असतात असा माझा समज नाही ..ते इतर भाषिक हि असतील , पण मला
अनुभव हा मराठी भाषिक "फेसबुक" करांचा आला !
ह्या अश्या प्रकारच्या लोकांन मुळे बहुतेक कला , साहित्य यांचे जास्त नुकसान होत असावे. Content creators ना credit न देता जर हे लोकं बिनधास्त copy-paste करत असतील तर ह्याला चोऱ्या नाही तर काय म्हणायचे ? असो !
( पूर्वी मी ह्या असल्या लोकांना "नामू पारिट" म्हणायचो , पण ते बरोबर नाही , हि लोकं नामू सारखी निर्लज्ज असली तरी innocent निष्पाप नाहीत. ह्यांच्या वर राग येण्या पेक्षा कीव येते )

मी पुढे हि मराठीत उत्तम विनोदी लेख लिहित राहीन , सवाई बद्दल दरवर्षी पोस्ट करत राहीन ..हे लोकं दरवर्षी copy-paste करत रहातील .. पण मी पुढच्या वर्षी पासून त्यांना "असं करू नका" हे सांगून माझा वेळ वाया घालवणार नाही !   
(तो पर्यंत बहुतेक हि पोस्ट हि "सवाई" उचलेकरां कडून  copy-paste झाली असेल )



Friday, July 6, 2018

Lost in Transliteration .. मन तू पार उतर कहाँ जाई हो




At the outset , let me confess my bias that "translations" of classic literature from one language to other NEVER works right. Infact , it invariably misinterprets the true meaning , nuances and interpretation that is envisioned in its native language (barring some rare exceptions )
There are numerous examples of this and I always tend to ignore such "translations". There is a big business of this "Translation of books into other languages" , more so in Marathi, where good Marathi writers have ventured and dared to translate classic literature from other languages into Marathi ( more so for commercial reason than the real need )
Similar attempts of translating classic Marathi literature into other languages (particularly English) have seemed childish play of words that have lost all the nuances and meaning during translation. (The classic example being the translations of the work of popular Marathi writers like Pu La Deshpande )
I came across Marathi translations ( better be called Transliterations ) of selected works of Kabir, Mira and other "Hindi belt" saints by a famous Marathi poet (Late) Mangesh Padgaokar.
Though this poet is popular in Marathi and has created some of the best poetry in modern Marathi literature , he totally fails in capturing nuances of works in Hindi by great saints, into Marathi. Infact , to be candid , such work looks like the hilarious "tranliteration" that one comes across during "literal" word to word translations by "Google" !!

I am not trying to criticize the late poet , but the following example clearly shows how the meaning is lost in "Tranliterations", when a poet simply uses the same word ( Utar jaiyyo here ) to translate from Hindi to Marathi, without caring for the hidden philosophy or the understanding that the same word has drastically different connotation and meaning in two languages.
In Marathi translation of "मन तू पार उतर कहाँ जाई हो" , the poet Late Mangesh Padgaokar has used the literal translation of "उतर जाई हो" to "उतरुनी जाशी" ... this totally disrupts the true meaning by Kabir (and distorts the idea behind original phrase) !
What Kabir implies in saying "Paar utar jaana" ( पार उतर जाना), is crossing the worldly pleasures towards enlightenment, more of positive connotation . The word phrase and verb "Utaruni jaashi" ( उतरुनी जाशी ) has a totally different connotation in Marathi language. It tends to mean "spoiled" , e.g आंबा उतरून गेला ( the mango got over riped and spoiled ) .. एखादा माणूस मनातून उतरून गेला ( losing credibility of some one in one's mind )
This loss in translation was more evident when the said Kabir lines "मन तू पार उतर कहाँ जाई हो" were sung by a singer along with the Marathi translation. The connotation and meaning got lost instantly ! Here is the link
 

 I realize such losses in translations in more pronounced fashion and with bigger amplification because of my education in multi-lingual environment of Kendriya Vidyalay , where I was fortunate to learn top A grade Hindi literature along with English during schooling. With Marathi as mother tongue spoken at home, brought up in culturally rich Pune, I was fortunate to grasp the best of Marathi literature.
The intention of this post is not to single out and criticize a particular poet , but to bring forth how "literal translations" spoil the "classicalness" of a brilliant creation !