अरे वेड्या मना तळमळसि ...पुलंचा पिलू
पिलू आहेच असा .. वरून हसतमुख वाटणारा , कारुण्याची झळ घेऊन येणारा .. पेटी चं हि तसच आहे ... जे वाजतं त्या पेक्षा जे ऐकू येत नाही त्याची कळ अधिक जाणवते ..
आणि हो .. पेटी ऐकावी , पिलू ऐकावा तो पीएल चा .. फक्त पुल !
अरे वेड्या मना तळमळसि,
उगीच का असा हळहळसि,
प्रथम फसलेसी
ऐन सुखाच्या समयी भीती धरुनी कसे बसलेसी
लतामंडपा सुख सेवाया, येईन पुनः पुनः तुझपाशी
अरे वेड्या मना तळमळसि